दिव्यांग जोडप्यांनी विवाह केल्यास मिळणार ५० हजारांचे अनुदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : अपंगांचे पुर्नवसन व त्यांचे जिवनमान सुधारनेच्या उद्देशाने शासनामार्फत एक व्यक्ती व दुसरा अव्यंग असल्यास तसेच त्यांचे अपंगत्व ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असणाऱ्या अशा अपंग व्यक्तींनी विवाह केल्यास अशा जोडप्यांना ५० हजार रुपयांचे  रोख अनुदान जिल्हा परिषद मार्फतीने दिले जाणार आहे.

 योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा नाही. अर्जासोबत विवाह नोंदनी प्रमाणपत्र आधार कार्ड, रेशन कार्ड, जन्म दाखला व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र इत्यादी दस्तऐवज आवश्यक राहणार आहेत. जोडप्यांचा विवाह १ वर्षाच्या आतील असावा व वर लाभार्थीं हा गडचिरोली जिल्हयातील रहिवासी असावा तसेच या पुर्वी आंतरजातीय विवाह योजनाचा लाभ घेतलेला नसावा. अशा अपंग व्यक्तींनी विवाह केलेला असल्यास प्रस्ताव समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली या कार्यालयाकडे सादर करावा. असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांनी केले  आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-31


Related Photos