सोशल मीडियाचा वाढता वापर , दारावर ऐकू येणारी पोस्टमनची हाक होत आहे दुर्मीळ


-  पोस्टकार्डची उत्सुकता झाली कमी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुल :
गावोगावी, शहरी गल्लीबोळात व मोहल्ल्यात प्रत्येक परिवारांचे सदस्य एका व्यक्तीची मोठ्या आतूरतेने वाट पाहत. तो म्हणजे खाकी गणवेशधारी सायकलवरून येणारा दारावर टिकटिक करून पोस्टमन शब्द उच्चारणारा केंद्र सरकारचा कर्मचारी.  परंतू बदलत्या काळानुसार पोस्टमनची प्रतीक्षा करण्याची वेळ संपली आहे. दारावर वाजणारी टिकटिक किंवा पोस्टमन शब्द कानी पडणे आता दर्मीळ झाले आहे. पूर्वी पोस्टमनची हाक ऐकू आल्यावर लहान थोर आतुरतेने धावत निघायचे.पोसटमनचा आदरसत्कार व्हायचा. पहिले पत्र घरी पडताच गृहिणी आनंदी व्हायच्या,परंतू आता मोबाईल,व्हीडीओ कलिंग फेसबूक,व्हाॅटसॲप, ईमेल या साधानांमुळे तत्काळ क्षणात वार्तालाप होतो. 
पोस्टमनच्या हाती एखाद्या टेलिग्राम दिसला की , मनात वादळ निर्माण व्हायचे. ज्या घरी पोस्टमन तार घेऊन जायचा,तेथे शेजारी जमा व्हायचे. तारमध्ये आनंद असो की, दुःखाचा समाचार सर्व शेजारी शेजारधर्म पाळत होते. आता आधुनिक युगात शेजारधर्म पाळण्याकडे कुणालाही वेळ नाही. पोस्टमनला ग्रामीण भागात जणू देवतूत समजले जात असे. अशिक्षित लोकांना पत्र वाचून दाखविणे,मनिऑर्डर  आलेला पैसा घरोघर पेाहोचविणे त्याचे काम होते. आता मनिऑर्डर  जवळपास बंद झाल्यातच जमा आहे. खेडोपाडी प्रत्येकाच्या खिशात एटीएम कार्ड आले. हाताखाली दुचाकी आली, क्षणात एटीएम वर जाऊन पैसे काढता येऊ लागलेत. परंतु मनिऑर्डर   आणणा-या पोस्टमनला पाहून जो आनंद होतो. तो एटीममुळे होत नाही. तसेच वेगवेळे ॲप उपलब्ध झाल्याने क्षणात पैसे वळते करणे सोपे झाले आहे.  शिवाय डाकसेवेतून पोस्टकार्ड जवळपास बंद झाल्यातच जमा झाले. मोबाईलमुळे अंतर्देशीय कार्ड व लिफाफ्याचा वापर कमी झाला आहे. पोस्टाची टेलिग्राम सेवा बंद झाली आहे. शासनाची १५२ वर्षे जुनी आंतरराष्ट्रीय टेलिग्राम सेवा बंद होण्याच्या मार्गावर आहे. भारतात ११ फेब्रवारी १८८५ रोजी प्रथम इंग्रजीत टेलिग्राम सेवा सुरू झाली. १९६० च्या दशकात विभिन्न डाकघरात टेलिप्रिंटर मशीन लावण्यात आले. एक जून १९४९ मध्ये आग्रा व पटनासह नऊ शहरात हिंदी टेलिग्राम सेवा उपलब्ध करण्यात आली. परिवर्तन निसर्गाचा नियम आहे, त्यामुळे अत्यंत उपयोगी ठरलेली सेवा वृध्द झाली आहे. मोबाईल,फॅक्स,ईमेलच्या वापरात वाढ झाली आहे. त्यातच आजघडीला विदेशातील मित्र नातेवाईक लॅपटाॅप,संगणकाकावर ऑनलाईन चॅटिग करू शकतो. शेवटी काय अत्याधुनिक सेवेमुळे फायदा होत असला तरी माणुस माणसापासून दुरावत चालल्याचे सध्याचे चित्र आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-05-31


Related Photos