नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, अमित शहा गृहमंत्री , परिवहन खाते पुन्हा नितीन गडकरी यांच्याकडेच


- निर्मला सीतारामन यांना अर्थ खात्याची जबाबदारी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून प्रथमच लोकसभेत निवडून आलेले भाजपाध्यक्ष व मोदींचे विश्वासू सहकारी अमित शहा यांच्याकडं गृहखात्याचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, पीयूष गोयल यांच्याकडील जबाबदाऱ्या 'जैसे थे' ठेवण्यात आल्या आहेत. मागील सरकारमध्ये गृहमंत्री असलेल्या राजनाथ सिंह यांची संरक्षणमंत्रिपदी वर्णी लागली असून निर्मला सीतारामन यांना अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
मंत्री आणि जबाबदारी
पंतप्रधान - नरेंद्र मोदी
संरक्षणमंत्री - राजनाथ सिंह
गृहमंत्री - अमित शहा
परिवहन - नितीन गडकरी
अर्थमंत्री - निर्मला सीतारामन
परराष्ट्र - एस. जयशंकर
पेट्रोलियम - धर्मेंद्र प्रधान
महिला-बालकल्याण - स्मृती इराणी
आरोग्यमंत्री - डॉ. हर्षवर्धन
रेल्वेमंत्री - पीयूष गोयल
क्रीडा - किरेन रिजीजू
सामाजिक न्याय - थावरचंद गेहलोत
News - World | Posted : 2019-05-31