पायात फास अडकल्याने टिपेश्वर अभयारण्यातील वाघ मरणाच्या दारात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
गेल्या काही दिवसांपासून उजव्या पायात फास अडकल्याने यवतमाळ जिह्याच्या टिपेश्वर अभयारण्यातील एक वाघ मरणाच्या दारात उभा आहे. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर बनली असून त्यामुळे वनविभाग चिंतेत आहे. विशेष म्हणजे या वाघाला कॉलर आयडी बसविली आहे. दिवसेंदिवस या वाघाची प्रकृती ढासळत असून त्याला वाचविण्यासाठी वनविभागाची धावपळ सुरू आहे. पर्यटकांना अभयारण्यात फिरत असताना कक्ष क्रमांक १०० मध्ये पिलखान नाल्याच्या वरच्या बाजुला एक वाघ दिसला. सदर वाघाच्या उजव्या पायाच्या पंजाच्यावर दोरीचा फास अडकून जखम झाल्याचे निदर्शनास आले.  Print


News - Nagpur | Posted : 2019-05-31


Related Photos