महत्वाच्या बातम्या

 कालेश्वर-मुक्तेश्वर मंदिरात माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते अभिषेक पूजा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सिरोंचा : सिरोंचा लगतच्या तेलंगाणा राज्यातील कालेश्वर मंदिरात माजी जि. प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते अभिषेक पूजा करण्यात आले.

महाराष्ट्र-तेलंगणा राज्याचे विभाजन करत वाहणाऱ्या गोदावरी, प्राणहिता आणि अंतर वाहिनी सरस्वती या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर कालेश्वर-मुक्तेश्वर हे प्रसिद्ध मंदिर आहे. भारतातील १२ ज्योतीर्लिंगांपैकी असे हे कालेश्वर शिव मंदिर आहे. काशीला जाणे शक्य झाले नाही तर, कालेश्वर येथे जाऊन कालेश्वर-मुक्तेश्वर या जोड शिवलिंगाचे दर्शन घेतल्यास पापनिवारण होऊन स्वर्गप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे येथे १२ ही महिने भाविकांची गर्दी असते. अत्यंत पुरातन काळापासून काशी विश्वेश्वरनंतर कालेश्वर येथील शिव मंदिर प्रसिद्ध आहे. येथील मंदिराच्या चारही मुख्य द्वारासमोर चार नंदीबैलाचे आहे. विशेष कालेश्वर - मुक्तेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त तेलंगाणा, आंध्रप्रदेश छत्तीसगडसह महाराष्ट्रातील गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो भाविक दर्शन घेतात.

भाग्यश्री आत्राम ह्या तीन दिवस सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना ९ सप्टेंबर रोजी पहाटे च्या सुमारास कालेश्वर मंदिरात अभिषेक पूजा करून दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सर्व सामान्य नागरिक, शेतकर्यांसाठी त्यांनी देवाकडे साकडे घातले. यावेळी सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos