नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून घेतली शपथ


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून  राष्ट्रपती भवनात   दिमाखदार सोहळ्यात  शपथ घेतली . 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंग आणि नितीन गडकरी यांनी शपथ घेतली. 
 जम्मू-काश्मीरमधील भाजपचे नेते आणि पंतप्रधान कार्यलयाचे माजी मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली . गोव्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीपाद नाईक  , राव इंद्रजित सिंह यांनी , संतोष गंगवार यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 
  गजेंद्रसिंह शेखावत  , गेल्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेले गिरीराजसिंह ,  मुंबईतील शिवसेनेचे खासदार डॉ. अरविंद सावंत,  महेंद्रनाथ पांडे , कर्नाटकातील भाजपचे नेते प्रल्हाद जोशी  , माजी अल्पसंख्यांकमंत्री मुख्तार अब्बास , ओडिशातील भाजपचे नेते आणि माजी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, मुंबईतील भाजपचे नेते आणि माजी रेल्वेमंत्री पियुष गोयल, भाजपचे नेते प्रकाश जावडेकर , काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव करणाऱ्या स्मृती इराणी , अर्जुन मुंडा,  रमेश पोखरियाल निशांक,  माजी परराष्ट्र सचिव डॉ. एस. जयशंकर,  थावरचंद गहलोत , हरसिमरत कौर बादल,  रविशंकर प्रसाद, नरेंद्रसिंह तोमर, लोक जनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान , माजी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण ,  कर्नाटकातील भाजपचे वरिष्ठ नेते सदानंद गौडा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजूनही शपथ विधीचा कार्यक्रम सुरु आहे.   Print


News - World | Posted : 2019-05-30


Related Photos