अडीच हजारांची लाच स्वीकारणारा क्षेत्रसहाय्यक एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा :
फिरत्या पथकाने सागवानी लाकडे भरलेला ट्रॅक्टर पकडून दंड ठोठावला . तक्रारदाराने टॅक्टर सोडविला व दंडसुध्दा भरला. मात्र ट्रॅक्टर सोडविण्यासाठी मदत केल्याचा मोबदला म्हणून अडीच हजारांची लाच स्वीकारताना जांभली येथील क्षेत्र सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
राहुल बळीराम धारणे (४०) क्षेत्र सहाय्यक कार्यालय जांभली  लाखांदूर रोड साकोली जि. भंडारा  असे लाचखोराचे नाव आहे.  तक्रारदार  सावरी ता. लाखनी जि. भंडारा येथील रहीवासी असुन लाकुड खरेदी व विक्रीचे काम करतो. तक्रारदाराच्या प्लाॅट वर बिनापरवानागीने ट्रॅक्टरमध्ये सागवणाचे लाकुड ठेवले होते. सदर ट्रॅक्टर काल २८ मे रोजी फिरते पथकाचा क्षेत्रसहाय्यक राहुल धारणे याने पकडला. त्यावर कायदेशिर कारवाई करून दंड ठोठावला. सदर प्रकरणात    दंड भरून तक्रारदाराने ट्रॅक्टर नेत असतांना क्षेत्रसहाय्यक राहुल धारणे याने तक्रारदारास सदर प्रकरणात सागवणाचे लाकुड तसेच ट्रॅक्टर सोडण्याकरिता केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून ५ हजार रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदारास राहुल धारणे याने मागणी केलेली लाच रक्कम देण्याची   इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा येथे तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग  भंडारा तर्फे  आज ३० मे रोजी सापळा कार्यवाही करण्यात आली.   कार्यवाही दरम्यान राहुल धारणे  याला तडजोडअंती  २ हजार ५०० रूपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. यावरून आरोपीविरूध्द   लाखनी पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध कायदा अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे (अतिरिक्त कार्यभार) ,  अपर पोलिस अधीक्षक राजेश  दुद्दलवार, यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक महेश चाटे,  पोलिस निरीक्षक प्रतापराव भोसले,  पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, पो.ना. सचिन हलमारे, अश्विनकुमार गोस्वामी, पोलिस शिपाई पराग राउत, सुनिल  हुकरे, चालक पो.ना. दिनेश  धार्मीक  यांनी केली आहे.

   Print


News - Bhandara | Posted : 2019-05-30


Related Photos