राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये विलीनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा नाही


- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले स्पष्ट 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी  नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना पवार यांनी राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर परखड मत व्यक्त केले. तसेच बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये विलीनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही हे देखील स्पष्ट केले.
बैठकीनंतर शरद पवार म्हणाले की, राहुल गांधी यांच्यासोबत दोन्ही सभागृहातील विरोधीपक्षनेतेपदाबाबत चर्चा झाली. बैठकीत महाराष्ट्रातील निवडणुकीवरही चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच राहुल गांधी यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना पवार म्हणाले की, काँग्रेसमध्ये नेतृत्वाची कमतरता भासत असावी. तसेच पर्याय नसताना मैदान सोडणे योग्य नाही असे परखड मत शरद पवारांनी राहुल गांधींच्या राजीनाम्यावर व्यक्त केले.  Print


News - World | Posted : 2019-05-30


Related Photos