‘याला’ मनोरूग्ण म्हणायचे की स्वच्छतादूत?


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
अजय कुकडकर / गडचिरोली :
देशात स्वच्छ भारत उपक्रम राबविण्यात आला. मात्र पाहिजे त्या प्रमाणात स्वच्छता कुठेच दिसून आली नाही. तसेच गडचिरोली नगर पालिकेनेही स्वच्छ गडचिरोली, सुंदर गडचिरोलीचा नारा दिला. मात्र अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचून आहेत. अनेक सुजान नागरीकच कचरा पेटीत कचरा टाकण्याऐवजी कचरापेटीलगत बाहेरच कचरा टाकून देतात. अशा सुजान नागरीकांना शिकवण देणारे दृश्य सध्या गडचिरोली शहरात पहावयास मिळत आहे. ‘परशा’ नावाने ओळखला जाणारा मनोरूग्ण कचराकुंडीजवळील कचरा गोळा करून कचरा कुंडीत टाकून स्वच्छतेचा संदेश देत आहे, यामुळे त्याला मनोरूग्ण म्हणावे, की स्वच्छतादूत असा प्रश्न उपस्थित होत आहे.
परशा शहरातील कोणत्याही भागात फिरताना दिसतो. मनोरूग्ण असून तो सतत हसत असतो. अंगावर तोकडे आणि मळकट कपडे घातलेला परशा मिळेल ते खाऊन जागा मिळेल तिथे झोपून जातो. मात्र दिवसभर त्याचे काही ना काही उद्योग सुरूच असतात. विशेष म्हणजे तो कचराकुंडीजवळ दिसून येतो. अस्ताव्यस्त पडलेला कचरा गोळा करून कचराकुंडीत टाकतो. हातात झाडू घेवून सभोवतालचा परिसर झाडून स्वच्छ करतो. यामुळे कचरा कुंडीजवळ येवून कचराकुंडीत कचरा न टाकता दुरूनच बाजूला कचरा फेकून जाणाऱ्या , स्वतःला सुजाण म्हणवणाऱ्या नागरीकांनी परशा चा आदर्श घ्यायला नक्कीच हरकत नाही.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-30


Related Photos