कैद्यांनी झालेल्या चुका विसरून उज्वल भविष्य घडवावे : शालीक पडघन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
कैदी बांधवानी आपल्या भूतकाळातील झालेल्या चुकांना विसरून  पूढे पुढे आपला आर्थिक व सामाजिक विकास करून आपले उज्वल भविष्य घडवावे असा सल्ला व मार्गदर्शन मनरेगा गडचिरोलीचे संवर्ग विकास अधिकारी शालीक पडघन यांनी केले. सोबतच मनरेगा द्वारे कैदी बांधवा करीता योजनांची माहिती दिली. 
ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजीत आणि बँक ऑफ इंडिया द्वारा संचालीत स्टार ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांनी गडचिरोली तुरूंगातील कैदी बांधवांसाठी आयोजित केलेल्या  भाजीपाला लागवड व व्यवस्थापन या १० दिवसीय प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमूख अतिथी म्हणून शालीक पडघन बोलत होते . याप्रसंगी जिल्हा अग्रणी बँकेचे  प्रबंधक प्रमोद भोसले, तुरुंग  अधिक्षक निमगडे, कृषी विज्ञान केंद्र सोनापूर चे डॉ विक्रम कदम व डॉ पुष्पक बोथीकर  , संस्थेचे संचालक सन्यूशाह टेकाम , कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम व काटकर उपस्थित होते. २- मे ते २९ मे २०१९ या दहा दिवसीय कार्यकमाचे उद्घाटन बँक ऑफ इंडियाचे एरीया प्रबंधक विजय सिंह बैस यांच्याहस्ते  झाले.  कृषी विज्ञान केंद्राचे डॉ बोथीकर यांनी प्रात्यक्षिक आणि चर्चेद्वारे मार्गदर्शन केलें . समारोपीय कार्यकमात देविदास दडमल आणि अजित सिंह या बंदीवानाने आपल्या मनोगतातून संस्थेचे आभार मानले . डॉ विक्रम कदम यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या विविध योजनांची माहिती दिली. बँक नेहमी आपल्या पाठीशी असेल अशी ग्वाही प्रमोद भोसले यांनी दिली. कार्यक्रमाचे  संचालन हेमंत मेश्राम यांनी तर आभार  संचालक सन्नू शाह टेकाम यांनी केलें. कर्यक्रमाप्रसंगी अधिकारी व बंदी उपस्थित होते .         यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांना  प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-30


Related Photos