महत्वाच्या बातम्या

 मुरखळा येथील विद्या विहार कॉन्व्हेंट हायस्कूल येथे राखी बनविण्याची स्पर्धा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : मुरखळा येथील विद्या विहार काॅन्व्हेट हायस्कूल येथे राखी बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. 

या स्पर्धेत पालकवर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गीता हिंगे आधारविश्व फाऊंडेशन गडचिरोली च्या अध्यक्षा तसेच विजया मने प्राध्यापिका श्रीमती सिंधुताई पोरेड्डीवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय गोगाव तसेच आधारविश्व फाउंडेशन  सदस्या या उपस्थित होत्या. 

हिंगे यांनी आपल्या भाषणातून आधारविश्व फाउंडेशन तर्फे घेण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमाबद्दल माहिती दिली व विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले. तर प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या विजया मने यांनी माता-पालक आणि शिक्षक यांच्या सहकार्य आणि परस्पर संबंधातूनच शाळेचा विकास आणि प्रगती शक्य होऊ शकते, असे प्रतिपादन केले. तसेच विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले. 

शाळेच्या उप मुख्याध्यापिका तपोती गयाली तसेच वरिष्ठ शिक्षिका स्वाती चोलूवार यांनी देखील सर्व विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले. अतिथीचे परिचय सहाय्यक शिक्षिका संजीवनी मने यांनी करून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका ज्योती खेवले यांनी केले. 

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची भाषणे झाली. सहाय्यक शिक्षिका अंजली दोडके यानी मधुर गायन केले. कार्यक्रमाची सांगता सहाय्यक शिक्षिका संगिता कन्नाके  यांनी केली. यावेळी त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos