अवजड वाहनाचेे ब्रेक फेल, धानोरा मार्गावरील वाहतूक अर्धा तास खोळंबली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
शहरातील धानोरा आणि चंद्रपूर मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. यामुळे ऐकेरी वाहतूक सुरू असून नागरीकांची चांगलीच वाताहात होत आहे. अशातच आज जेसीबी वाहून नेणाऱ्या एका अवडज ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक रस्त्यातच अडकून पडला. यामुळे दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागून वाहतूक तब्बल अर्धा तास खोळंबली होती. 
धानोरा मार्गावरून एक ट्रक जेसीबी वाहून नेत होता. वनविभागाच्या कार्यालयाजवळ या ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले. यामुळे ट्रक रस्त्यातच अडकला. आधीच ऐकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे व रस्ता अरूंद असल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. अनेक बसेस तसेच खासगी वाहने अडकून पडली. यामुळे नागरीकांना तसेच प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. महामार्गाच्या निर्मितीचे काम मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. यामुळे शहरातील वाहतूकीची कोंडी होत आहे. यामुळे महामार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी केली जात आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-30


Related Photos