महत्वाच्या बातम्या

 सांस्कृतिक कार्यक्रमांसह दहीहंडी उत्सव साजरा


- दहीहंडी उत्सवात पहिल्यांदाच युवतींनी घेतला सहभाग

- माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचा पुढाकार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : तालुका मुख्यालयातील तहसील कार्यालय परिसरात माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली भव्य सांस्कृतिक व दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी येथील तहसीलदार नितेंद्र शिकतोडे, ठाणेदार कुमारसिंग राठोड, नागरसेवक नागेश्वर गागापूरवार, माजी नगरसेवक तथा सामाजीक कार्यकर्ते रवी रालाबंडीवार, नगर सेवक जगदीश रालाबंडीवार, सतीश भोगे, सतीश राचर्लावार, राकॉचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, गणेश बोधनवार, नगर सेविका नुसरत बाबर शेख रवी सुलतान, फिरोज खान आदी उपस्थित होते.

बाल गोपाल मटकी फोड मंडळ सिरोंचा तर्फे आयोजित सांस्कृतिक तथा दहीहंडी कार्यक्रमसाठी माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याकडून प्रथम पारितोषिक ३१ हजार तर द्वितीय पारितोषिक ११ हजार रुपये देण्यात आले होते. या कार्यक्रमात एकूण ८ गोविंदा पथक सहभाग झाले होते. विशेष म्हणजे पहिल्यांदाच गोविंदा पथकात युवतींनी सहभाग घेतल्याने याठिकाणी आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा परिषद हायस्कुल सिरोंचा संघाने प्रथम पारितोषिक पटकाविले तर वाल्मिकी संघाने दुसरा पारितोषिक पटकाविले. युवतींची एकच संघ सहभाग झाल्याने त्यांना विजेतेपद देण्यात आले. तालुक्यातील विविध गावातून बाल गोपालांच्या वेशभूषेत संस्कृतीक कार्यक्रमात सहभाग झालेल्या बालगोपालांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.

एकंदरीत सिरोंचा तालुका मुख्यालयात मोठ्या उत्साहाने सांस्कृतिक तथा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला, असून मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. भाग्याश्री आत्राम यांनी गोविंदा पथकात पहिल्यांदाच सहभाग झालेल्या युवतींना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचा उत्साह वाढविला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos