महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली पोलीस दलातर्फे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी संवाद व प्रबोधनपर कार्यशाळेचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जादुटोना विरोधी कायद्याला १० वर्ष पुर्ण होत असल्याने अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या वतीने महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोना प्रतिबंध व उच्चाटन कायदा - २०१३ अर्थात जादुटोना विरोधी कायद्याविषयी जिल्ह्रातील पोस्टे/उपपोस्टे/पोमकें मधील पोलीस अधिकारी/अंमलदार व पोलीस पाटील यांचेशी संवाद साधता यावा तसेच येथील नागरिकांच्या मनात असलेल्या जादूटोना विषयीची अंधश्रद्धा दुर करता यावी याकरीता पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या पुढाकाराने अंधश्रध्दा निर्मुलन व जादुटोना प्रतिबंध कायदा संबंधी संवाद व प्रबोधनपर कार्यशाळेचे आयोजन आज ०७ सप्टेंबर २०२३ रोजी पोलीस मुख्यालय परीसरातील एकलव्य हॉल येथे करण्यात आले.

या आयोजीत कार्यशाळेमध्ये पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथील अधिकारी व अंमलदार तसेच त्यांच्या हद्दीतील २०० ते २५० च्या संख्येने पोलीस पाटील उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यशाळेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते पाण्यावर दिवा पेटवून करण्यात आले. यानंतर उपस्थितीत मान्यवरांनी जादुटोना विरोधी कायद्याबाबत संपुर्ण माहिती व जादुटोन्याचे चमत्कार कसे होतात, त्याबाबत काय उपाययोजना करता येतील याबाबतची संपुर्ण माहिती समजावुन सांगितली.  

यासोबतच अंधश्रद्धेवर आधारित पाण्यावर दिवा कसा पेटत असतो, सळाख सोडणे इ. प्रकारचे चमत्कारीक प्रयोग प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थितांना दाखविण्यात आले. तसेच पोलीस अधीक्षक यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, पाण्यावर दिवा पेटणे हे चमत्कार नसून पाणी आणि कॅल्शियम कार्बाईटचा खडा एकत्र केल्याने त्यावर रासायनिक अभिक्रिया घडून गॅसची निर्मीती होत असते व निर्माण होणा­या गॅसमुळे हा दिवा पेटत असतो.  तसेच अंधश्रद्धा पाळणे, जादुटोना करणे हा कायद्याने गुन्हा असून येथील नागरिकांनी अंधश्रद्धेला आणि जादुटोन्याला जास्त प्राधान्य न देता आपला विकास आपणच साधावा असे आवाहन केले.

सदर कार्यशाळेमध्ये पोलीस अधीक्षक नीलोत्पल अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारीनी सदस्या श्रीमती. नंदिनी जाधव, राज्य कार्यकारीनी सदस्य रामभाऊ डोंगरे, राज्य बुवाबाजी संघर्ष कार्यवाहक भगवान रनदिवे, गडचिरोली येथील स्थानिक शाखेचे डॉ. चंद्रशेखर डोंगरवार तसेच प्रा. मुनिस्वर बोरकर, कांतीलाल साखरे, सरोज साखरे व माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनंदा आतला हे उपस्थित होते.

कार्यशाळेच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय अधिकारी सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोनि. राहुल आव्हाड व पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. नरेंन्द्र पिवाळ व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos