२० हजारांची लाच स्वीकारतांना नागपूर शहर तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
  प्रतिनिधी / नागपूर :
फ्लॅटचे हप्ते वेळेवर भरू न शकल्यामुळे जप्तीच्या आदेशास एक महिना स्थगिती देण्यासाठी २०  हजारांची लाच स्वीकारताना नागपूर शहर तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपीक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. नितेश रूपचंद मानमोडे (२७) असे लाचखोर कनिष्ठ लिपीकाचे नाव आहे. 
तक्रारदाराने नागपूर येथील पंचम अपार्टमेंटमध्ये फ्लॅट खरेदी करण्यासाठी साधना सहकारी बॅंक लिमिटेड कडून कर्ज घेतले होते. कर्जाचे काही हफ्ते नियमित भरू न शकल्यामुळे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांनी नागपूर शहर तहसील कार्यालयातील तहसीलदारांना मालमत्तेचा ताबा घेवून बॅंकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे ताबा देण्याचे नमुद केले होते. यामुळे कारवाई थांबविण्यासाठी तक्रारदाराने कनिष्ठ लिपीक मानमोडे याची भेट घेतली होती. मानमोडे याने २० हजारांची लाच मागितली. याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर आज २९ मे रोजी सापळा रचून मानमोडे याला अटक करण्यात आली. 

   Print


News - Nagpur | Posted : 2019-05-29


Related Photos