नागरिकांनी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा
- पीओपीची मुर्ती खरेदी विक्रीवर बंदी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वर्षभरातील सर्व सण व उत्सव पर्यावरणपुरक पध्दतीने साजरे करण्याच्या सुचनेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस विभाग, तहसिल विभाग व नगरपालिकांनी पीओपीमुर्ती खरेदी व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, असे आदेश निर्गमीत करण्यात आले आहे.
नागरिकांनी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी पीओपीच्या मुर्तीचा वापर न करता पारंपारिक मातीच्या मुर्तीचा वापर करावा असे, आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी केले आहे.
केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळांनी प्रकाशित केलेल्या मुर्ती विर्सजनाबाबतच्या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार पीओपी मुर्ती उत्पादनाववर बंदी घालण्यात आली आहे.
नवीन मार्गदर्शक तत्वानुसार कोणताही विषारी अजैविक कच्चा माल नसलेला केवळ नैसर्गिक, जैवविघटनशील, पर्यावरणस्नेही कच्चा माल जसे पारंपारिक माती यांना प्रोत्साहन दिले आहे. आणि प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तीना प्रतिबंध घातला आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
News - Wardha