नागपुरात उष्माघाताने ४८ तासांत दहा जणांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
 गेल्या दोन आठवड्यांपासून विदर्भात सूर्य आग ओकत असून  सध्या उन्हाचा तीव्र प्रकोप दिसून येत असून  मंगळवारी उपराजधानीत ४७.५ अंश सेल्सिअस इतके इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले.  उष्णतेच्या या लाटेत  ४८ तासांत उष्माघाताने दहा जणांचा जीव गेला आहे.   गेल्या दोन आठवड्यात किमान २५ अनोळखी व्यक्तींचे मृतदेह रस्त्यावर आढळले आहेत. 
  गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कॉटन मार्केट येथे, रामझुल्याखाली तसेच अशोक चौकातील फुटपाथवर, कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एम्पायर ट्रान्सपोर्ट कॅरियर दुकानाच्या पायरीवर, सक्करदरा उडाणपुलाखाली, हनुमान मंदिर परिसरातील भोसले जिमसमोर, मोठा ताजबागेतील बुलंद गेटसमोर, धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील केअर हॉस्पिटल समोरील शहीद उड्डाण पुलाखाली, सिव्हिल लाइन्स परिसरातील आयजी ऑफिसच्या कुंपणाजवळील फुटपाथवर, सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रयास ॲकॅडमीच्या प्रवेशद्वाराच्या बाजूच्या पॅसेजमध्ये अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आढळले आहेत.     चंद्रपुरात सर्वाधिक ४७.८ इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली.    Print


News - Nagpur | Posted : 2019-05-29


Related Photos