महत्वाच्या बातम्या

 सैनिकी वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / नागपूर : शहरातील विविध शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या आजी सैनिक किंवा माजी सैनिकांच्या पाल्यांना सवलतीच्या दरात व सैनिक विधवांच्या पाल्यांना मोफत निवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध असणाऱ्या वसतीगृहामध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

माजी सैनिकी मुलांचे वसतिगृह क्षमता ६० व माजी सैनिकी मुलींचे वसतिगृह क्षमता ७० असणाऱ्या या वस्तीगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आजी सैनिक, माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी प्रवेश अर्जाचा फॉर्म, माजी सैनिक ओळखपत्र, गुणपत्रिका व शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेल्या संस्थेच्या दाखल्याची छायांकित प्रतीसह ३० सप्टेंबरपर्यंत माजी सैनिकी मुलांचे-मुलींचे वसतिगृह, हिस्लॉप कॉलेज जवळ, सिव्हिल लाईन्स इथे  जमा करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. शिल्पा खरपकर यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos