शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा प्रत्यय उराडे गडचिरोली जिल्ह्यातून प्रथम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
 : आज इयत्ता बारावीचा निकाल जाहिर झाला असून गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ६८.८० टक्के लागला आहे. गडचिरोली येथील शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रत्यय जीवनलाल उराडे याने ९२.१५  टक्के गुण मिळवित जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. त्याला ६५० पैकी ५९९ गुण मिळाले आहेत.
शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा निकाल ८२.३३  टक्के लागला आहे. या महाविद्यालयातून आशुतोष अरविंद वैद्य याने ८९.६९  टक्के गुण मिळविले आहेत. क्रोद गजानन बारसागडे याने ८४ टक्के, निकुंज संजय साखरे याने ८१.२३ टक्के, अ्रकुश तामदेव वैरागडे याने ८१.०७ टक्के, सौरव भुपेश कुडवे याने ८०.९२ टक्के आणि उत्कर्ष जयदेव सोरते याने ८०.१५ टक्के गुण पटकाविले आहेत.
यशस्वी विद्याथ्र्यांचे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री, सचिव देवराव पा. म्हशाखेत्री, प्राचार्य जी.एम. दिवटे, उपमुख्याध्यापक डी.टी. मामीडवार, पर्यवेक्षक डी.के. उरकुडे, पी.एन. उरकुडे, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदांनी अभिनंदन केले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-28


Related Photos