महत्वाच्या बातम्या

 कोरची : मोकाट जनावरांचा रस्त्यावर वावर, वाहनचालक त्रस्त


- नगरपंचायत येथे निवेदन देऊनही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : कोरची परिसरातील मुख्य रहदारीच्या मार्गावर, तसेच परिसरातील अंतर्गत रस्त्यावर दिवसभर ठाण  बसलेली किंवा उभी असलेली मोकाट जनावरे पादचारी आणि वाहन चालक यांच्यासाठी एक डोकेदुखी बनली आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, मोकाट जनावरांच्या कडपामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, वाहन चालकांच्या जीव धोक्यात आला आहे. परिणामी रस्त्यावरील जनावरामुळे पादचारी त्रस्त झाला आहे. गेल्या काही दिवसापासून मोकाट जनावरांच्या परिसरात त्रास वाढला आहे. शहरातील मार्गावरील आणि वेगवेगळ्या भागातील. रस्त्यावर तर जणू काही ठिकाणी जनावरांचे साम्राज्य असल्यामुळे वाहन चालकांना त्याच्या त्रास सहन करावा लागतो आहे. मोकाट जनावर रस्त्यावर आडवे आल्याने, दुचाकी घसरून पडण्याच्या घटना सतत घडत आहेत. 

यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन कधी नागरिक तर कधी स्वतः जनावरही जखमी होत आहेत. मात्र, नगरपंचायतीचे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यासंबंधी काही दिवसांपूर्वी नगरपंचायतला निवेदन देण्यात आले होते. परंतु याकडे अजूनही गांभीर्याने लक्ष न देता, नगरपंचायत चे अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. एखादे दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. सदर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन, समस्या सोडवावी अन्यथा एखादी दुर्घटना घडलीच तर, जबाबदार व्यक्तीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. अशा इशारा कोरचीच्या नागरिकांनी दिलेला आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos