गडचिरोली जिल्ह्यातील केवळ १२१८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल आज २८ मे रोजी जाहिर झाला असून  गडचिरोली जिल्हा निकालात  माघारला आहे. गडचिरोली जिल्ह्याचा निकाल केवळ ६८.८०  टक्के लागला आहे.
जिल्ह्यातील केवळ १ हजार २१८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ६  हजार ३७८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १ हजार १७० विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील १२ हजार ९०१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी १२ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.  एकूण ८ हजार ८३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर ४  हजार २४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखेतील परीक्षा दिलेल्या ४  हजार ६८८ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ५०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेतील ७ हजार ५३१ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार ८७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेतील २५१ विद्यार्थ्यांपैकी २०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर एचएससी व्होकेशनलच्या ४२७ विद्याथ्र्यांपैकी २९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-28


Related Photos