महत्वाच्या बातम्या

 उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : यावर्षी गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, शारदोत्सव इत्यादी सार्वजनिक कार्यक्रमाकरिता वर्गणी जमा करुन तात्पुरत्या स्वरुपात उत्सव साजरा करण्याकरिता मंडळाकडून ऑनलाईन परवानगी अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. तसेच परवानगी ऑनलाईन देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० च्या कलम ४१ (क) नुसार सन २०२३ नुसार उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना परवाणगी घेणे आवश्यक आहे. यासाठी www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा, ऑनलाईन अर्ज सादर करतांना मंडळांनी मंडळाचा ठराव ज्यामध्ये मंडळाचे नाव ठरविणे, मंडळाचे कार्यकारी मंडळ निवडणे, ज्या ठिकाणी मुर्तीची स्थापना, उत्सव साजरा करावयाचा आहे ते ठिकाण ठरविणे इत्यादी बाबींचा उल्लेख असावा.

मागील वर्षी परवानगी घेतली असल्यास मागील वर्षांचा हिशोब, मागील वर्षी परवानगी घेतली असल्यास परवानगी पत्र. ज्या जागेवर मुर्तीची स्थापना, उत्सव साजरा करावयाचा आहे, त्या जागेच्या मालकाचे मुर्तीस्थापनेसाठी, उत्सव साजरा करण्याबाबतचे ना-हरकत पत्र व सार्वजनिक जागेत मुर्तीची स्थापना, उत्सव साजरा करणा-या मंडळाकरिता ग्रामपंचायत, नगरपरिषद यांचे ना-हरकत प्रमाणपत्र, प्रथम वर्ष असल्यास प्रतिज्ञापत्र, अर्जदाराचे ओळखपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड इत्यादी कागदपत्रे अपलोड करावी.

अर्ज भरण्याची पध्दत : www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन प्रणाली मार्गदर्शन मध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबतची सविस्तर माहिती पहावी, असे सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos