झारखंडमध्ये माओवाद्यांनी केलेल्या एलईडी स्फोटात ११ जवान जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / रांची :
झारखंडमधील सराकेलाच्या कुचाई भागात माओवाद्यांनी केलेल्या एलईडी स्फोटात ११ जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमी जवानांना तातडीने हेलिकॉप्टरद्वारे उपचारासाठी रांचीतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमी जवानांमध्ये ३ झारखंड पोलीस आणि ८ '२०९ कोब्रा' जवानांचा समावेश आहे. मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी याच ठिकाणी माओवाद्यांनी हल्ला केला होता. आज पहाटे ४:५३ वाजता झारखंडमधील सरैकेला येखील कुचाई भागात हा स्फोट घडवण्यात आला. २०९ कोब्रा जवान आणि झारखंड पोलीस विशेष संयुक्त कारवाई दरम्यान हा हल्ला करण्यात आला. 

   Print


News - World | Posted : 2019-05-28


Related Photos