रायफल साफ करताना गोळी लागल्याने पोलिस शिपाई जखमी


- कारवाफा पोलिस मदत केंद्रातील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: रायफल साफ करीत असताना चुकून गोळी सुटल्याने पोलिस शिपाई जखमी झाल्याची घटना आज २८ मे रोजी धानोरा तालुक्यातील कारवाफा पोलिस मदत केंद्रात घडली आहे.
रुपेश वरखडे नामक पोलिस शिपाई आपली रायफल साफ करीत होते. अचानक रायफलमधून गोळी सुटल्याने वरखडे जखमी झाले. त्यांना तातडीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-05-28






Related Photos