आयसीसी विश्वचषक : १२ दिवस आधीच भारत - पाकिस्तान लढतीसाठी स्टेडियम हाउसफुल्ल


वृत्तसंस्था /  लंडन : इंग्लंडमधील आयसीसी विश्वचषकासाठी जगभरातील क्रिकेटशौकिनांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत ११ मैदानांवर ४६ दिवसांत ४८ लढती होणार आहेत. त्यातील ४५ साखळी सामने असून ३ बाद फेरीच्या लढती आहेत.  या सर्व लढतींमध्ये क्रिकेटशौकिनांना सर्वाधिक उत्सुकता लागली आहे ती भारत आणि पाकिस्तान या  प्रतिस्पर्धी संघांतील क्रिकेट लढतीची. १६ जूनला खेळवण्यात येणाऱ्या या लढतीची सर्व तिकिटे लढतीआधीच विकली गेली आहेत.
क्रिकेट विश्वचषकात आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात ६ सामने खेळवण्यात आले आहेत. त्यातील सर्व सहाही लढतीत टीम इंडियाने बाजी मारली आहे. त्यातील पाच लढतीत हिंदुस्थानी संघाने प्रथम फलंदाजी केली आहे. तर एका लढतीत लक्ष्याचा पाठलाग करीत विजय मिळवला आहे. गेल्या विश्वचषकात २०१५ मध्ये झालेल्या लढतीत हिंदुस्थानने पाकवर ७६ धावांनी विजय मिळवला होता.

   Print


News - World | Posted : 2019-05-28


Related Photos