महत्वाच्या बातम्या

 कोरची : मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : कोरची  येथील वार्ड क्रमांक दोन मधील मुख्य रस्ता हा मुख्य बाजारपेठेला जोडलेला असून, सदर रस्त्यावर अनेक वाहनांची वरचढ नेहमी दिसते. सदर मार्गावरून बरेच रहदारी मार्गक्रमण करतात. बरेच शालेय विद्यार्थी सुद्धा याच रस्त्याने मार्गक्रमण करताना दिसून येतात. मार्गालगत असलेल्या नंदनवन कॉलनी जवळ असलेल्या या मार्गावर, पाऊस आले की, रस्त्याचे रूपांतर तलावात झालेली दिसून येते. 

सदर रस्त्याच्या बाजूला नाली असतानाही, या रस्त्यावर नेहमीच पाणी दिसत असतो. या रस्त्यावरून अनेक वाहने जात असल्यामुळे अनेक पादचारी रहदाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बरेच विद्यार्थी या रस्त्याने मार्गक्रमण करत असताना. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा वरचढ असल्यामुळे नेहमी पाणी उसळत असते. यामुळे विद्यार्थ्यांनासुद्धा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

सदर रस्त्याच्या बाजूला, नाली असून जमा झालेला पाणी नालीद्वारे बाहेर काढता येतो. परंतु याकडे नगरपंचायतच्या कर्मचारी तथा पदअधिकारी यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. सदर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन, ही समस्या दूर करण्यात यावी. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos