कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने लहान भावाचा झोपेतच पडला मुडदा


  - कोरची तालुक्यातील  गडेली गावातील खळबळजनक घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरचीः 
 कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने आपल्या लहान भावाची  झोपेतच कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना खळबळजनक घटना काल २६ मे रोजी दुपारी २ वाजता च्या सुमारास तालुक्यातील गडेरा गावात घडली.
 टेंकसू सिताराम कोरेट्टी (३०)  रा.गडेरा असे मृतकाचे नाव आहे, तर सहदेव सिताराम कोरेट्टी (४२) अशी आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार  टेंकसू व सहदेव यांच्यात कौटुुंबिक वाद होता. टेंकसू हा  काल दुपारी झोपला असतांना  रागाच्या भरात मोठा भाऊ सहदेव याने  टेंकसूच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केला. त्यामुळे तो रक्ताच्या  थारोळ्यात पडला. घटना घडताच कुटुंबियांनी टेंकसूला कोरची येथील ग्रामीण रूग्णालयात भरती केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बेडगाव पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एन.एस.पोटे करीत आहेत.
 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-27


Related Photos