देशी दारूच्या ७५ पेट्या पाथरी पोलिसांनी केल्या जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / पाथरी :
गुप्त माहीतीच्या आधारे   पाथरी पोलीसांनी  रविवार   रात्री  नाकेबंदी करून  स्काॅर्पीओ वाहनातून  देशी दारूच्या ७५ पेट्या  जप्त केल्या आहेत. 
 पोलीसांनी गुप्त माहीतीचा आधारे नाकेबंदी केली. दरम्यान  गेवरा ते व्याहाड   मार्गावर अंतरगाव जवळ एका  स्काॅर्पिओ वाहनास पकडण्यात आले . यावेळी एकास अटक करण्यात आली असुन आनखी काही आरोपी रात्रोची वेळ असल्याने पसार झाले . यात ज्ञानेश्वर उर्फ बुची सुखदेव गेडाम (२९) ,रा. - व्याहाड खुर्द यास अटक करण्यात आली . एम.एच-०८ -झेड-०३७४ क्रमांकाच्या वाहनातुन ७ लाख ५०  हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली.   वाहनाची किंमत ५ लाख रुपये असून  एकूण १२ लाख ५०  हजार रुपयांचा  माल हस्तगत करण्यात आला.  ही कारवाही ठाणेदार कतलाम यांच्या मार्गदर्शनात दत्ता बोरडे , प्रविन पेंदोर, सुरेन्द्र काकडे, सुरज शेडमाके, राजु केवट यानी केली असुन पुढील तपास पाथरी पोलीस करीत आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-05-27


Related Photos