महत्वाच्या बातम्या

 ९ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरच्या वतीने रविवार, ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व संबंधितानी या सुवर्णसंधीचा लाभ राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून घ्यावा. जास्तीत जास्त प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवून त्यांचा निपटारा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी रूम नं. ३१०, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय विस्तारीत इमारत, सिव्हिल लाईन्स, नागपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा,   असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सचिन पाटील यांनी यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos