जम्मू कश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला


- रस्त्यालगत ठेवलेली स्फोटके केली उद्ध्वस्त 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दलांनी पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला. जम्मू-पुंछ महामार्गावरील कल्लार येथे आयईडीचा स्फोट घडवून आणण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला होता. मात्र, सुरक्षा दलांना वेळीच या हल्ल्याचा सुगावा लागला. यानंतर भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी या परिसराला घेराव घातला. परिसरात शोध घेतला असता स्फोटके आढळून आली. यानंतर रस्त्यावरील वाहतूक थांबवून ही स्फोटके उद्ध्वस्त करण्यात आली. सुरक्षा दलांनी वेळीच कारवाई केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा पुलवामासारख्या आणखी एका दहशतवादी हल्ल्याला सामोरे जावे लागले असते. 
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या काश्मीर खोऱ्यात सुरु असलेल्या ऑपरेशन ऑलआऊटमुळे दहशतवाद्यांची मोठी कोंडी झाली आहे. गेल्या १८ दिवसांत भारतीय लष्कराने १८ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. त्यामुळेच सैरभैर झालेल्या दहशतवाद्यांनी जम्मू-पुंछ महामार्गावर स्फोट घडवण्याचा कट आखला होता.   Print


News - World | Posted : 2019-05-27


Related Photos