महत्वाच्या बातम्या

 अहेरी येथील विजेची समस्या दूर होणार !


- मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

- अहेरी, पेरमिली, रेगुंठा येथे विज उपकेंद्र उभारण्याचा मार्ग प्रशस्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : मागील अनेक वर्षापासुनची एकमुखी मागणी असलेले अहेरी, पेरमिली, रेगुंठा येथील विज उपकेंद्र उभारणीसाठी निधी मंजूर झाले असून राज्याचे अन्न व ओषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले.  

अहेरी येथे ३३ के.व्ही. विज उपकेंद्र नसल्यामुळे कमी दाब व विद्युत पुरवठा नेहमी खंडित होत होते. उन्हाळ्यात तर फार मोठी अड़चन निर्माण व्हायची, त्यासाठी अहेरी येथील जनतेनी वारंवार ३३ के.व्ही. विज उपकेंद्र उभारण्यात यावे. यासाठी सातत्याने या भागाचे आमदार तथा राज्याचे अन्न व ओषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे मागणी लावून धरायचे, जनतेच्या रास्त मागणीची दखल घेऊन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी शासनाकडे विषय लावून धरले आणि अखेर अहेरी, पेरमिली सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा येथील विजेची समस्या सोडविन्यासाठी आदिवासी घटक कार्यक्रमा अंतर्गत भरिव निधी मंजूर करवून विज उपकेंद्र उभारण्याचा मार्ग प्रशस्त केले. नुकतेच राज्य शासनातर्फे तसे पत्रही निर्गमित झाले.

धर्मराव बाबा आत्राम यांची नुकतीच राज्याच्या कैबिनेट मंत्री पदी वर्णी लागताच मागील अनेक वर्षापासून रेंगाळत असलेले अहेरी येथील ३३ के.व्ही. विज उपकेंद्राचे समस्या मार्गी लागले असून अहेरी, पेरमिली व रेगुंठा भागातील नागरिकांनी शासनाचे व धर्मराव बाबा आत्राम यांचे आभार मानले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos