दंतेवाड्यातील भाजप आमदार आणि चार सुरक्षारक्षकांच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या आणखी एका नक्षलवाद्याला कंठस्नान


वृत्तसंस्था / दंतेवाडा : छत्तीसगड राज्यातील  दंतेवाडा येथे भाजप आमदार आणि त्यांच्या चार सुरक्षारक्षकांच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या आणखी एका नक्षलवाद्यांला कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. हिरोली येथील जंगलात झालेल्या पोलीस चकमकीत खात्मा करण्यात आला. या पूर्वी मंडावी यांच्या हत्येच्या कटातील सहभागी असलेला सुरुंग स्फोटाचा तज्ज्ञ वर्गीस या नक्षलवाद्यासह आणखी एकाला ठार करण्यात आले आहे.
दंतेवाडाचे पोलीस अधिक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितले की, राज्य राखीव दलाने केलेल्या कारवाईदरम्यान हिरोली येथील जंगलातील चकमकीत ठार झालेला नक्षली हा भाजप आमदार भीमा मंडावी यांच्या हत्येच्या कटात सहभागी होता. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारादरम्यान 9 एप्रिल रोजी दंतेवाडा येथे भाजप आमदार भीमा मांडवी यांच्या ताफ्यावर हल्ला करून नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवला होता. या स्फोटात आमदार मांडवी यांचा मृत्यू झाला, तर चार सुरक्षा जवान शहीद झाले होते.  Print


News - World | Posted : 2019-05-27


Related Photos