महत्वाच्या बातम्या

 पीएम स्वनिधी योजने अंतर्गत मनपाची विशेष शिबिरे


- पथविक्रेत्यांना कर्जाचा लाभ देण्यास प्रयत्न

विदर्भ न्यूस एक्सप्रेस 

प्रतिनिधि / चंद्रपूर : पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना सुरू करण्यात आली असुन अधिकाधिक पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी मनपाकडुन विशेष शिबिरे आयोजीत केली गेली आहेत.    

स्वनिधी योजना अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या १० हजार रुपये कर्जाचा लाभ आतापर्यंत ४ हजार ५९५ लाभार्थ्यांनी घेतला आहे. ८२५ विक्रेत्यांना २० हजार रुपये कर्जाचा लाभ घेतला असुन ७४ लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांचे कर्ज प्राप्त झाले आहे. अधिकाधिक संख्येत पथविक्रेत्यांना याचा लाभ मिळावा याकरीता चंद्रपूर महानगरपालिका प्रयत्नशील असुन याअंतर्गत २ व ३ सप्टेंबर रोजी समता चौक बाबुपेठ वॉर्ड, ४ व ५ सप्टेंबर रोजी शिवानी किराण स्टोर्स, रमाबाई नगर, अष्टभुजा वॉर्ड, ७ सप्टेंबर रोजी सोनझरी मोहल्ला हनुमान मंदिर बाबुपेठ वॉर्ड, ९ सप्टेंबर रोजी वैद्यनगर तुकुम, ९ सप्टेंबर पं. दीनदयाळ उपाध्याय प्राथमिक शाळा तुकुम तर १० सप्टेंबर रोजी सवारी बंगला, नगिनाबाग येथे विशेष शिबिरे घेण्यात येत आहेत.   

योजनेचा लाभ घेण्यास ऑनलाईन अर्ज करावा लागत असुन तो देखील निःशुल्क भरण्याची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत निःशुल्क ऑनलाईन अर्जाचा भरणा करण्यास दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका अभियान कार्यालय, बीपीएल ऑफिस, ज्युबली हायस्कूल समोर, कस्तुरबा रोड या ठिकाणी सकाळी ११ ते ६ वाजता संपर्क साधता येत असुन ज्यास्तीत ज्यास्त पथविक्रेत्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos