इसिसचे दहशतवादी समुद्रामार्गे घुसखोरीच्या तयारीत : केरळमध्ये हाय अलर्ट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / तिरुवअनंतपुरम :
'आयएस'चे १५ दहशतवादी नौकेतून श्रीलंकेहून लक्षद्वीपकडे येत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर केरळ समुद्रकिनारी भागात हाय अलर्ट जारी केला आहे. पोलिसांच्या उच्चपदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, तटरक्षक दल आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 
वरिष्ठ पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या हालचालींबाबतचे अशा प्रकारचे अलर्ट नित्याचाच भाग आहे. मात्र यावेळी नेमकी आकडेवारी सांगितलेली आहे. त्यामुळं अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे. संशयास्पद नौकेबाबत तटरक्षक दलाच्या चौक्यांना आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. २३ मे पासून हाय अलर्टवर असल्याचंही तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही सतर्क आहोत. मच्छिमार नौका आणि समुद्रात जाणाऱ्या लोकांना संशयास्पद नौकेबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. केरळातील अनेक लोक अजूनही 'आयएस'च्या संपर्कात आहेत, असा संशय गुप्तचर यंत्रणांना आहे. एप्रिलमध्ये श्रीलंकेत साखळी स्फोट घडवून आणले होते. त्यात अडीचशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर केरळमध्ये हायअलर्ट  जारी केला होता.   Print


News - World | Posted : 2019-05-26


Related Photos