महत्वाच्या बातम्या

 कोरची तालुक्याची जाणीव असलेल्या पोलीस अधिकाऱ्याची सहा महिन्याच्या सेवेनंतर तडकाफडकी बदली


- नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे सूर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : आदिवासी बहुल असलेल्या कोरची पोलीस स्टेशनला एक आदिवासी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिळाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये एक वेगळेच आनंद दिसून येत होते कारण तालुक्यातील नागरिकांना मुख्य प्रवाहात अन्याकरीता कुणीतरी कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या तालुक्यात आले असल्याचे चित्र कोरची तालुक्यात दिसून येत होते. कोरची तालुक्यातील जनतेचे तंटे सामान्यपणे सोडवून प्रत्येकाची बाजू सन्मानाने ऐकून त्यांना योग्य तो सल्ला कोरची पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फुलकुवर हे देत असल्याचे दिसून येत होते. परंतु आज त्यांची तडका फडकी बदलीची बातमी एकताच लोकांमध्ये तीव्र नाराजीचा सुर दिसून येत आहे. लोकांच्या मनामध्ये जागा बनवून लोकांच्या समस्याला मार्गी लावण्यासाठी झटणाऱ्या अधिकाऱ्याची अशी तडकाफडकी बदली होणे ही न पचणारी बाब आहे.

फिल्मी स्टाईलने पकडले होते आरोपीला : 

काही दिवसांपूर्वी कोरची तालुक्यातील कोचीनारा येथे आपल्या पत्नीचा खून करून मथुरा येथे पळून जाऊन साधूचा वेश धारण करून पोलीस विभागाला चकमा देणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी स्वतः साधूचा वेश परिधान करून फिल्मी स्टाईलने सापडा रचून त्याला रंगेहात पकडून कोरची येथे गणेश फुलकुवर यांनी आणले होते.

मागील दोन वर्षांपासून कोरची तालुक्यात अवैध धंद्यांना उत : 

कोरची तालुक्यात मागील दोन वर्षांपासून अवैध धंद्यांमध्ये वाढ झालेली असून नक्षल प्रभावीत तालुक्याची समस्या सांगून अवैध व्यवसायाकडे खुलेआम पणे दुर्लक्ष होत असल्यामुळे अवैध व्यवसायिकांचे कोरची जणू माहेरघर झाल्याचे दिसून येत आहे. मागील दोन वर्षात कोरची तालुक्यात दोन ते तीन वेळा मोठी कार्यवाही झाली ती पण गडचिरोली येथील पोलीस विभागांकडून. बातमी प्रकाशित होताच लहान व्यापाऱ्यांना त्रास देणे सुरू होते त्या मागचे उद्देश कदाचित बातमीदारांचे मुस्कट दाबणे असू शकते.

जिल्ह्यात एकूण ९९ नक्षली असल्याची माहिती : 

सध्या गडचिरोली जिल्ह्यात एकूण ९९ नक्षली अस्तित्वात असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी प्रेस कॉन्फरन्स  द्वारे सांगण्यात आली होती. तर संपूर्ण नक्षली हे कोरची तालुक्यातच आहेत का? हा सुद्धा खूप मोठा प्रश्न निर्माण होत आहे व अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याकरिता न पोहोचू शकणारे कोरची येथील पोलीस अधिकारी बातमी प्रकाशित होताच त्यांचे धंदे अचानकपणे बंद कसे होतात? हे सुद्धा खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कर्तव्यावर कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही न होता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अशी बदलीमुळे कोरची तालुक्यातील जनतेंमध्ये नाराजीच्या सूर दिसून येत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos