दुचाकीवरून कपडे विक्रीच्या बहाण्याने दारूची तस्करी करणाऱ्यास गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी :
दुचाकीवरून कपडे विक्रीच्या बहाण्याने दारूची खरेदी करून आष्टी येथे या दारूची विक्री करणाऱ्यास महागाव खुर्द येथील तंटामुक्ती अध्यक्ष  मुक्तिपथ गाव संघटनेचे सदस्य आणि इतर ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले. अली अख्तर अंजुमन असे त्याने नाव आहे. या इसमकडून ४० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. 
महागाव खुर्द नजीक असलेल्या प्राणहिता नदीपात्रात गावातील अनेक जण दारू गाळतात. हा प्रकार थांबण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेद्वारे दारूविक्री बंदीचा ठराव घेण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या गाव संघटनेच्या सभेत या ठरावाची प्रभावी अंमलबजावणी करण्याविषयी चर्चा करण्यात आली. गावात उघड दारूविक्री होत नसून वेगवेगळ्या मार्गाने ती सुरू आहे. शनिवारी गावात एक इसम दुचाकी वरून कपडे विक्री करीत होता. पण त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. हा इसम गावातून गावठी दारू विकत घेऊन कपड्याच्या पिशवीत लपवून बाहेरगावी विक्रीस नेत असल्याचे लक्षात आले. इसमाने पळ काढताच महागावचे पोलीस पाटील आणि इतरही ग्रामस्थांनी या इसमाचा पाठलाग करून त्याला गाठले. त्याची झडती घेतली असता कपड्याच्या पिशवीत लपविलेल्या गावठी दारूच्या ६ पिशव्या आढळल्या. महागाव येथून दारू विकत घेऊन ती आष्टी शहरात विकत असल्याची कबुली या इसमाने दिली. तात्काळ अहेरी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. अहेरी पोलिसांनी इसमाजवळील दारू जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. गावात येणाऱ्या प्रत्येक विक्रेत्यांवर आता पाळत ठेवणार असल्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-26


Related Photos