महत्वाच्या बातम्या

 नागभीड जवळ ट्रक आणि बस चा भीषण अपघात : १ गंभीर तर १२ किरकोळ जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील नागभिड जवळ आज सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान ट्रक आणि बस यांची आमने सामने धडक झाल्याने १ गंभीर जखमी तर १२ किरकोळ जखमी झाले. अपघात एवढा भयानक होता की बस आणि ट्रकचा समोरील भाग चेंदामेंदा होऊन ट्रक ड्रायव्हर ट्रक मध्ये एक तास फसुन राहिला. क्रेनच्या सहायाने त्याला बाहेर काढण्यात आले. त्याला नागपूर येथील दवाखान्यात हलविण्यात आले.

ब्रह्मपुरी आगारची  ब्रह्मपुरी ते अमरावती बस क्रमांक एम एच १३ सी यु ८३३७ ही बस सकाळी सात वाजता ब्रम्हपूरी वरून सुटली त्यामध्ये  वाहक म्हणून  सौ. रीना प्रकाश मेश्राम व बस चालक अविनाश रमेशराव उंबरकर हे होते. नागभीड समोर एक किलोमीटर अंतरावर नवखडा जवळ नागपूरवरून वडसा कडे गॅरेजचा माल घेवून ट्रक येत होता तर बस ब्रम्हपूरी वरून नागपूर कडे जात होती. ट्रक ड्रायव्हर ने बस च्या दिशेने आणून बसला धडक दिली यामध्ये बस चालक, बसवाहक, ट्रक ड्रायव्हर यासोबत प्रवासी जखमी झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे दाखल करण्यात आले तर ट्रक ड्रायव्हर यांचे दोन्हीही पाय निकामी झाल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

अविनाश रमेश उंबरकर वय ४० वर्ष बस चालक, सौ.रीना प्रकाश मेश्राम वय ३८ वर्ष बस वाहक, मारोती प्रभाकर कापगते वय ४९ वर्ष, रा . नवेगाव बांध,   मुकेश सुधाकर निकोसे वय २८ वर्ष रा. वाढोना, ता. उमरेड जिल्हा.नागपूर, स्नेहा गोविंदा वरटे वय २० वर्ष रा. खैरी ता. चिमूर, विलास मारोती विधाते वय ४८ वर्ष रा. वडसा, संजय रामकृष्ण मोहदे वय ५४ वर्ष रा. ब्रह्मपुरी, मनीषा मोहदे वय ४८ वर्ष, श्लोक संजय मोहदे वय १६ वर्ष रा. ब्रह्मपुरी, महेंद्र केवळराम करंबे वय ४४ वर्ष रा. ब्रह्मपुरी, मंथला महेंद्र करंबे वय ३४ वर्ष, अर्धाश महेंद्र करंबे वय ७ वर्ष, तुकाराम रामदास चावडे वय ७८ वर्ष रा. ब्रह्मपुरी असे जखमी झालेल्यांचे नाव आहे.

पुढील तपास नागभीड पोलीस स्टेशन चे  ठाणेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक साखरे हे करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos