डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी सीबीआयने मुंबईतून केली दोघांना अटक


वृत्तसंस्था / मुंबई :  डॉ.  नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी केंद्रीय अन्वेशन विभाग अर्थात सीबीआयने ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे  या दोघांना मुंबईतून अटक केली आहे.  
याआधी सीबीआयने दाभोळकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्याला अटक आली होती. सचिन अणधुरे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याला संभाजीनगरमधील संभाजीपेठेतून अटक करण्यात आली होती. त्याआधी दाभोळकर हत्ये प्रकरणी वीरेंद्र तावड़े याला अटक करण्यात आली होती. आता मुंबईतून दोघांना अटक केली आहे. आतापर्यंत सीबीआयने वीरेंद्र तावड़े, सचिन अणधुरे, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक केली आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-05-25


Related Photos