जोगिसाखरा जवळ ट्रॅक्टर अपघातात एक महीला जागीच ठार, ३ जण जखमी


 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी /  आरमोरी :  तालुक्यातील जोगिसाखरा गावालगत  शेतावर कामासाठी ट्रॅक्टरने   जात असताना समोरुण आलेल्या जनावरांच्या कळपाला वाचविण्यासाठी चालकाने जोरदार ब्रेक मारल्याने   ट्रॅक्टर पलटून झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाल्याची घटना आज २५ मे रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.  या अपघातात ३ जण  जखमी झाले. जखमींना आरमोरी ऊपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. 
तालुक्यातील जोगीसाखरा येथील पांदण रस्त्यावरून ट्रॅक्टर  क्र.MH.33 - F 3887 व ट्राली  क्र.MH - 33 4633  शेताकडे जात होते.  दरम्यान समोरुण जनावरांचा कळप  धावत आल्याने त्यांना वाचविण्यासाठी चालकाने ब्रेक मारला. यामुळे नियंत्रण सुटल्याने  ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली पालटला. या अपघातात   पुष्पा बाजीराव ऊईके (३२)  ही जागिच ठार झाली. तर तिचे पती  बाजीराव ऊईके  (३५)  प्रनय बाजीराव ऊईके (१३)  शिल्पा धमा कुमरे (२७) हे गंभीर  जखमी झाले.  अपघाताची माहिती मिळताच गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेसचे सचिव .विलास पेन्दाम यांनी  घटनास्थळी धाव घेत आपल्या स्वतःच्या जखमींना रुग्णालयात हलविले तसेच पोलिसांना माहिती दिली.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-25


Related Photos