काँग्रेसची बैठक, पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल गांधींचा राजीनामा


वृत्तसंस्था / नवी दिल्ली : १७ लोकसभा निवडणूकीत झालेल्या दणदणीत पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.  
आज तक या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार काँग्रेसच्या कार्यकारीणी सदस्यांची दिल्लीत आज बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत राहुल गांधी यांनी राजीनामा सादर केला आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे की नाही याबाबत अद्याप समजलेले नाही.  काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे राहुल गांधींची समजूत काढत असल्याचे समजते.   Print


News - World | Posted : 2019-05-25


Related Photos