२८ लाख २८ हजाराच्या मुद्देमालासह जप्त : आरोपीस अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
२२ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पडोली परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पथक पडोली रोडवर हुंडाई शोरूमचे बाजुला असलेल्या कोळसा प्लाटमध्ये अवैध रित्या दारू विक्रीकरीता आणली आहे अशा माहितीवरून तात्काळ त्या परिसरात पोहचून पाहणी केली तर मिळालेल्या माहितीप्रमाणे कोळसा प्लाटची झडती घेतली असता, एका खोलीमध्ये विदेशी दारूचे १३३ बाॅक्स व देशी दारूचे ७१ बाॅक्स असा एकुण २८ लाख २८ हजार रूपयाचा माल मिळून आला. सदरचा गुन्हा पोलीस स्टेशन पडोली येथे नोंद करण्यात आला असुन आरोपी नामे ईमया येलप्पा मंजलवार रा. आमटावार्ड पडोली यांचेविरूध्द कार्यवाही करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक चंद्रपूर महेश्वर रेड्डी यांचे मार्गदर्शनात स्थागुशा प्रभारी पोनि ओ.जी.कोकाटे , यांचे नेतृत्वात पोउपनि.जितेंद्र वैरागडे, सफौ. पंडीत वऱ्हाटे , पोहवा विजय संगीडवार, नापोशि. अनुप, अमजद खान, अविनाश दशमवार, पोशि रविंद्र पंधरे, विनोद जाधव, मयुर येरणे, चंद्रशेखर आसुटकर व वामन ढाकणे यांनी पार पाडली.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-05-25


Related Photos