५१४ जागांचे निकाल जाहीर, भाजपला ३०२ तर काँग्रेसला ५२ जागा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
काल २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. काही राज्यातील अनेक जागांची मतमोजणी आज पूर्ण झाली.  आतापर्यंत ५४१ जागांचे निकाल जाहीर झाले असून अरुणाचल प्रदेशात लोकसभेच्या दोन जागा असून यापैकी अरुणाचल पश्चिम मतदारसंघाचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. या मतदारसंघात अजूनही मतमोजणी सुरू आहे.
आतापर्यंत ५४१ जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यात भाजपला सर्वाधिक ३०२ जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या आहेत. द्रमुक २३ जागांसह तिसऱ्या स्थानी असून तृणमूल काँग्रेस आणि वायएसआर काँग्रेसला प्रत्येकी २२ जागा मिळाल्या आहेत. जागांनिहाय क्रमवारी लक्षात घेता शिवसेना १८ जागांसह देशातील सहाव्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यानंतर जदयुला १६, बिजू जनता दलाला १२ तर बसपाला १० जागा मिळाल्या आहेत. बाकी कोणत्याही पक्षाला १० चा आकडाही गाठता आलेला नाही. तेलंगण राष्ट्र समितीला ९, लोकजनशक्ती पार्टीला ६ तर राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाला प्रत्येकी ५ जागा मिळाल्या आहेत.   Print


News - World | Posted : 2019-05-24


Related Photos