महत्वाच्या बातम्या

 ९ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेत पेन्शन अदालतीचे आयोजन 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता कै. आबासाहेब खेडकर सभागृहात पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या वर्ग-३ व वर्ग- ४ मधील कर्मचा-यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरीता पेन्शन अदालत घेण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांनी सेवाविषयक लाभाबाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी तक्रारींसह कै. आबासाहेब खेडकर सभागृह, जिल्हा परिषद, नागपूर उपस्थित राहावे. टोकन वाटप सकाळी ९.३० ते १०.३० पर्यंत करण्यात येईल. तसेच पेन्शन अदालत यापुढे दर महिण्याचा दुस-या मंगळवारी घेण्यात येईल. त्या दिवशी शासकीय सुटी असल्यास लगतच्या दुस-या दिवशी घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos