राज्यातील कोणत्या मतदारसंघात कोण विजयी , कोण पराभूत?


- पहा विदर्भ न्यूज एक्सप्रेस चा रिपोर्ट 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : काल जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात  राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघां पैकी भाजपा-शिवसेनेला मोठे यश मिळाले आहे.   राज्यात मुख्य लढत भाजपा-सेना युती विरुद्ध कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी झाली. राज्यातील ४८ जागांपैकी २३ जागांवर भाजपा, १८ जागांवर शिवसेना, ५ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळवला असून काँग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे.   

पाहुयात कोणत्या मतदारसंघात कोण  विजयी आणि  कोण पराभूत  झाले 

नंदुरबार मतदारसंघातून भाजपच्या हिना  गावित (भाजपा) विजयी झाल्या. काँग्रेसचे के सी पाडवी  पराभूत झाले आहेत.  धुळे मतदारसंघातून  भाजपचे सुभाष भामरे  विजयी झाले तर काँग्रेसचे  कुणाल पाटील पराभूत झाले आहेत.  जळगाव भाजपचे उन्मेष पाटील  विजयी झाले त्यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांना पराभूत केले आहे.  रावेर मतदारसंघातून  भाजपच्या रक्षा खडसे विजयी झाल्या आहेत तर काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील  पराभूत झाले आहेत.  बुलडाणा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रतापराव जाधव विजयी झाले आहेत. त्यांनी राकॉ चे  राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला आहे.  अकोला मतदारसंघातून भाजपचे  संजय धोत्रे विजयी झाले आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे  प्रकाश आंबेडकर  पराभूत झाले आहेत.  अमरावती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनीत कौर राणा  विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ  यांचा पराभव  केला आहे.  वर्धा मतदारसंघातून  भाजपचे रामदास तडस  विजयी झाले असून त्यांनी काँग्रेसच्या चारुलता टोकस यांचा पराभव  केला आहे.  रामटेक मतदारसंघातून  शिवसेनेचे कृपाल तुमाने  यांनी काँग्रेसचे किशोर गजभिये यांचा पराभव केला आहे.  नागपूर मतदारसंघातून नितीन गडकरी  यांचा विजय झाला असून काँग्रेसचे राष्ट्रीय नेते  नाना पटोले  पराभूत झाले आहेत.  भंडारा-गोंदिया मतदारसंघातून  भाजपचे सुनील मेंढे  विजयी  झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे   नाना पंचबुद्धे  यांचा पराभव केला आहे.  गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून  भाजपचे अशोक नेते विजयी  झाले असून त्यांनी  काँग्रेसच्या डॉ. नामदेव उसेंडी  यांना  पराभूत केले आहे. चंद्रपूर मतदारसंघातून  काँग्रेसचे सुरेश धानोरकर  विजयी  झाले. त्यांनी विद्यमान केंद्रीय मंत्री भाजपचे हंसराज अहीर  यांना पराभूत केले आहे. यवतमाळ - वाशिम मतदारसंघातून  शिवसेनेच्या भावना गवळी ह्या पाचव्यांदा  विजयी  झाल्या आहेत.  त्यांनी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे याना पराभूत केले आहे.  हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत पाटील  विजयी झाले आहेत त्यांनी  काँग्रेसचे सुभाष वानखेडे  याना पराभूत केले आहे.  नांदेड मतदारसंघातून  भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर  विजयी झाले तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री  अशोक चव्हाण पराभूत झाले आहेत.  परभणी मतदारसंघातून  शिवसेनेचे संजय जाधव  विजयी झाले आहेत. त्यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे  राजेश विटेकर  याना पराभूत  केले आहे.  जालना मतदारसंघातून  भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे  विजयी झाले आहेत.  त्यांनी काँग्रेसचे विलास औताडे  याना पराभूत  केले आहे.  औरंगाबाद मतदारसंघातून एमआयएमचे  इम्तियाज जलील विजयी झाले आहेत.  त्यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे याना पराभूत केले आहे.  दिंडोरी मतदारसंघातून भाजपच्या  भारती पवार विजयी  झाल्या. त्यांनी   राष्ट्रवादी काँग्रेसचे धनराज महाले  यांना पराभूत  केले आहे.  नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत गोडसे विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे  समीर भुजबळ  यांचा पराभव केला आहे.  पालघर  मतदारसंघातून  शिवसेनेचे  राजेंद्र गावित  विजयी  झाले आहेत. त्यांनी बहुजन विकास आघाडीचे  बळीराम जाधव  यांचा पराभव केला आहे.  भिवंडी मतदारसंघातून भाजपचे कपिल पाटील  विजयी झाले आहेत.  त्यांनी काँग्रेसचे सुरेश टावरे यांचा पराभव केला आहे.  कल्याण मतदारसंघातून  शिवसेनेचे श्रीकांत शिंदे  विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील  यांचा पराभव केला आहे.  ठाणे मतदारसंघातून  शिवसेनेचे राजन विचारे विजयी झाले आहेत. त्यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे  यांना पराभूत केले आहे.  मुंबई उत्तर मतदारसंघातून  भाजपचे गोपाळ शेट्टी विजयी  झाले. त्यांनी अभिनेत्री आणि काँग्रेसच्या उमेदवार  ऊर्मिला मातोंडकर  याना पराभूत केले आहे.  मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून  शिवसेनेचे गजानन कीर्तिकर विजयी  झाले आहेत.  त्यांनी काँग्रेसचे संजय निरुपम  याना पराभूत केले आहे.  मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून  भाजपचे मनोज कोटक  विजयी झाले आहेत. त्यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांना पराभूत केले आहे.  मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपच्या  पूनम महाजन विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना पराभूत केले आहे.  मुंबई दक्षिण मध्य  मतदारसंघातून  शिवसेनेचे राहुल शेवाळे  विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे  एकनाथ गायकवाड  याना पराभूतकेले आहे.  मुंबई दक्षिण मतदारसंघातून  शिवसेनेचे अरविंद सावंत  विजयी झाले. त्यांनी  काँग्रेसचे मिलिंद देवरा याना पराभूत केले आहे.  रायगड मतदारसंघातून  राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री  अनंत गिते याना  पराभूत  केले आहे. 

मावळ मतदारसंघातून  शिवसेनेचे श्रीरंग बारणे  विजयी झाले आहेत. त्यांनी   राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ अजित  पवार  याना पराभूत केले आहे.  पुणे मतदारसंघातून  भाजपचे गिरीश बापट विजयी झाले.   त्यांनी काँग्रेसचे मोहन जोशी  यांचा पराभव केला आहे.  बारामती मतदारसंघातून  राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे विजयी  झाल्या आहेत. त्यांनी  भाजपच्या कांचन कूल याना पराभूत  केले आहे.  शिरूर मतदारसंघातून   राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे  विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे  शिवाजीराव आढळराव पाटील  याना पराभूत केले आहे.  अहमदनगर मतदारसंघातून  भाजपचे सुजय विखे  विजयी झाले. त्यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप याना पराभूत केले आहे.  शिर्डी मतदारसंघातून  शिवसेनेचे सदाशिव लोखंडे  विजयी झाले तर  काँग्रेसचे भाऊसाहेब मल्हारी कांबळे पराभूत झाले आहेत.  बीड मतदारसंघातून  भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे विजयी झाल्या तर  राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे पराभूत झाले.  उस्मानाबाद मतदारसंघातून  शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर विजयी झाले. त्यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा जगजितसिंह पाटील  याना पराभूत  केले.  लातूर मतदारसंघातून  भाजपचे सुधाकर शृंगारे  विजयी झाले. त्यांनी  काँग्रेसचे मच्छिंद्र कामत  याना पराभूत  केले.  सोलापूर मतदारसंघातून  भाजपचे जय सिद्धेश्वर स्वामी  विजयी झाले त्यांनी  काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे  प्रकाश आंबेडकर  याना पराभूत केले आहे. माढा  मतदारसंघातून  भाजपचे  रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयी -झाले. त्यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे याना पराभूत केले.  सांगली मतदारसंघातून  भाजपचे संजय पाटील विजयीझाले.  त्यांनी वंचित बहुजन आघाडी चे गोपीचंद पडळकर याना पराभूत केले.  सातारा मतदारसंघातून  राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले विजयी झाले. त्यांनी  शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांचा प्रभाव केला.   रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून    शिवसेनेचे विनायक राऊत विजयी झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे  निलेश राणे याना पराभूत केले आहे.  कोल्हापूर मतदारसंघातून   शिवसेनेचे संजय मंडलिक विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक  याना पराभूत केले आहे.  हातकणंगले मतदारसंघातून   शिवसेनेचे धैर्यशील माने  विजयी झाले आहेत. त्यांनी  स्वाभिमानी शेतकरी संघटना चे राजू शेट्टी याना पराभूत केले आहे.  



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-05-24






Related Photos