महत्वाच्या बातम्या

 विवाहित असूनही दुसरे लग्न करून शरीर संबंध ठेवणे हा बलात्कार : हाय कोर्टाचा निर्णय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने विवाहबाह्य संबंधांवर महत्वाचा निर्णय दिला आहे. पहिले लग्न झालेले असताना दुसरे लग्न करून शरीर संबंध ठेवणे हे बलात्काराच्या व्याख्येत येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

असे वागणे बलात्कार असतो. यामुळे बलात्कार आणि दुसऱ्या विवाहाच्या आरोपाखाली आरोपींविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

घटस्फोट झाल्याचे भासवून विधवा महिलेशी शरीर संबंध ठेवल्याचा आरोप आरोपीवर आहे. पतीच्या निधनानंतर परिचयाच्या व्यक्तीने महिलेशी जवळीक वाढविली होती. आपले पत्नीशी जुळत नसून तिच्यापासून वेगळे होणार आहे, असे तिला सांगितले होते. यानंतर १८ जून २०१४ मध्ये त्याने महिलेशी लग्न केले होते. परंतू, त्याचे पहिले लग्न अस्तित्वात होते. आरोपी दोन वर्षे महिलेसोबत राहिला आणि सोडून गेला. यामुळे पीडितेने २७ सप्टेंबर २०१९ रोजी एफआयआर दाखल केला. तो गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आरोपीने हायकोर्टात दाखल केली होती.

आरोपीच्या वकिलाने कोर्टात बाजू मांडताना म्हटले होते की, अशिलाने पीडितेशी लग्न केले होते आणि तिच्या संमतीने संबंध ठेवले होते, त्यामुळे बलात्काराचे प्रकरण बनत नाही. तसेच अशिलाने २०१० मध्ये पहिल्या पत्नीपासून घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला होता हे तक्रारदार महिलेला माहिती होते. त्याने पीडितेला सामाजिक, आर्थिक आणि नैतिक पाठिंबा दिला आहे.

यावर न्यायालयाने वकिलाचा युक्तीवाद खोडून काढताना म्हटले की, हिंदू कायदा पहिला विवाह अस्तित्वात असताना दुसऱ्या लग्नाला परवानगी देत नाही. जर कोणी असे केले तर तो धर्मद्वेषाचा गुन्हा मानला जाईल. पहिला विवाह अस्तित्वात असतानाच आपण दुसरे लग्न केल्याचे आरोपीने कबूल केले आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याचे आश्वासन देऊन त्याने पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले. यामुळे हा बलात्काच्या कक्षेत येतो.





  Print






News - Rajy




Related Photos