अहेरी विधानसभा क्षेत्र वगळता पाचही विधानसभा क्षेत्रात अशोक नेते यांची आघाडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी/ गडचिरोली :
गडचिरोली - चिमूर  लोकसभा क्षेत्राच्या  निवडणुकीत  अहेरी विधानसभा क्षेत्र वगळता पाचही विधानसभा क्षेत्रात भाजपा - शिवसेना युतीचे  उमेदवार अशोक नेते यांनी आघाडी घेतल्याचे निदर्शनास आले आहे.
 अहेरी विधानसभा क्षेत्राच्या पहिल्या फेरीत नेते यांना ३ हजार ३९८ तर काँग्रेसचे डॉ. उसेंडी यांना ३ हजार ४० मते मिळाली. दुसऱ्या फेरीत डॉ. उसेंडी यांना ३ हजार ११  तर अशोक नेते यांना २ हजार ५७१ मते मिळाली. या फेरीत अहेरी विधानसभा क्षेत्रात डॉ. उसेंडी यांनी ४४० मतांची आघाडी घेतली. तिसऱ्या फेरीत  अशोक नेते यांना ४ हजार ४८१ तर डॉ. उसेंडी ३ हजार ५५९ मते मिळाली. चौथ्या फेरीमध्ये अहेरी विधानसभा क्षेत्रात अशोक नेते यांना ५ हजार ९३५ तर डॉ.  उसेंडी यांना २ हजार ८१२ मते मिळाली. पाचव्या फेरीत अशोक नेते यांना ३ हजार  ८८८ तर डॉ. उसेंडी यांना ३ हजार १६५ मते मिळाली. सहाव्या फेरीत अशोक नेते यांना २ हजार २०५ तर डॉ. उसेंडी यांना २ हजार ६२० मते मिळाली आहेत. सातव्या फेरीत अशोक नेते यांना ४ हजार २११ तर डॉ. उसेंडी यांना ३ हजार १११ मते मिळाली. 
आठव्या फेरीत अशोक नेते यांना २ हजार ८१३ तर डॉ. उसेंडी यांना ३ हजार ९५१ मते मिळाली. या पेâरीत काँग्रेसचे डॉ. उसेंडी यांना या विधानसभा क्षेत्रातून १ हजार १३८ मतांची आघाडी घेतली. नवव्या फेरीत अशोक नेते यांना १ हजार  ७५४ तर डॉ. उसेंडी यांना २ हजार ७२८ मते मिळाली. या फेरीमध्ये देखील डॉ. उसेंडी  यांनी ९७४ मतांची आघाडी घेतली होती. दहाव्या फेरीत अशोक नेते यांना ३ हजार ८२६ तर डॉ. उसेंडी यांना ३ हजार १३१ मते मिळाली. अकराव्या फेरीत अशोक नेते  यांना ४ हजार ४७ तर डॉ. उसेंडी यांना ४ हजार १ मते मिळाली. बाराव्या फेरीत अशोक नेते यांना २ हजार ९७८ तर डॉ. उसेंडी यांना  ३ हजार ४७२ मते मिळाली. या फेरीत डॉ. उसेंडी यांना ४९४ मतांची आघाडी घेतली. १३ व्या फेरीत अशोक नेते यांना २ हजार ४०३ तर डॉ. उसेंडी यांना २ ३४३ मते  मिळाली. या फेरीत डॉ. उसेंडी यांनी ६० मतांची आघाडी घेतली. १४ व्या फेरीमध्ये अशोक नेते यांना ३ हजार १२९ तर डॉ. उसेंडी यांना १ हजार ७२५ मते मिळाली.  १५ व्या फेरीत अशोक नेते यांना २ हजार ६३१ तर डॉ. उसेंडी यांना २ हजार ९७० मते मिळाली. या फेरीत डॉ. उसेंडी यांनी ३३९ मतांची आघाडी घेतली. १६ व्या फेरीत अशोक नेते यांना २ हजार ११४ तर डॉ. उसेंडी यांना ३ हजार ७२४ मते मिळाली. या फेरीत डॉ. उसेंडी यांनी १ हजार ६१० मतांची आघाडी घेतली.  १७ व्या फेरीपासून तर २१ व्या फेरीपर्यंत डॉ. उसेंडी यांनी अनुक्रमे १ हजार ६६१, १ हजार ६२०, २ हजार १२, २ हजार ४५ व १ हजार ५२५ मतांची आघाडी घेतली होती.  २१ व्या फेरी अखेरपर्यंत अहेरी विधानसभा क्षेत्रातून काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. उसेंडी यांना ६९ हजार ६९२ तर भाजपा - सेना  युतीचे उमेदवार अशोक नेते यांना ६२ हजार  ९२४ मते मिळाली. यामध्ये या विधानसभा क्षेत्रातून डॉ. उसेंडी यांना ६ हजार ७६८ मतांची आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-24


Related Photos