महत्वाच्या बातम्या

 माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळामधून सन २०२२-२३ या वर्षांमध्ये इयत्ता दहावी  व बारावीच्या परीक्षेमध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुण  मिळालेल्या. तसेच पदवी किंवा पदव्युतर विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक किंवा माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांना १० हजार रुपये तसेच आयआयटी, आयआयएमएस अशा नामवंत व ख्याती प्राप्त संस्थेमध्ये प्रवेश मिळालेल्या पाल्यांना २५ हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू पुरस्कार, साहित्य, संगीत, गायन-वादन, नृत्य पुरस्कार, यशस्वी उद्योजक संघ, संगणक क्षेत्रात अतुलनिय कामगिरी, पूर, दरोडा, अपघात आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमूल्य कामगिरी करून देश आणि राज्याची प्रतिष्ठा वाढवणाऱ्या माजी सैनिक, विधवा पत्नी, पाल्य यांना अशा कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरासाठी रुपये दहा हजार व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी रुपये पंचवीस हजाराचा पुरस्कार जिल्हा सैनिक कल्याण विभाग पुणे, यांच्यामार्फत प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्कारासाठी अर्ज करण्याची २० सप्टेंबर शेवटची तारीख आहे. जे पाल्य केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली येथून उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच आपले अर्ज जिल्हा सैनिक कार्यालयात जमा करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. शिल्पा खरपकर यांनी केले आहे. 





  Print






News - Nagpur




Related Photos