महत्वाच्या बातम्या

 दरोड्याच्या गुन्हातील दोन आरोपींना गडचिरोली पोलीस दलाने केले अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : २८ ऑगस्ट २०२३ रोजी कुरखेडा हद्दीतील दोन युवक १) मारोती लक्ष्मण गोतमारे (२६), २) विलास मांजरे (४३) हे त्यांचे कडील गावठी डुक्करे ५० नग विकण्यासाठी नरेंद्र कुमार राहणार बालोद (छत्तीसगड) येथे गेलेले होते. 

डुक्करे विक्री करून मिळालेले १ लाख ५० हजार रुपये घेऊन परत येत असताना वाटेत २ हजार रुपयाचा डिझेल भरून घेतला. पोलिस मदत केंद्र बेडगाव हद्दीतील बोरी या गावा जवळ वाहण आले असता, त्यांना २ इसमाना ८ ते ९ इसम मारहाण करत असल्याचे दिसून आले. त्यापैकी एक अनोळखी व्यक्ती फिर्यादी यांचे गाडी जवळ येऊन त्यांचे मोबाईल व गाडीची चावी हिसकावून फिर्यादी यास जमिनीवर पाडून ८ ते ९ इसमांनी हॉकी स्टिक, लोखंडी रोड व लाकडाच्या काठीने जबर मारहाण केली आहे.

हे सर्व होत असताना अचानक मागे एक चारचाकी गाडी असल्याने सर्व त्या गाडीचे दिशेने धावत गेले. त्यातील एक इसम याने फिर्यादी यांचे गाडीतील १ लाख ४८ हजार रुपये काढून घेतले व त्याचे स्कॉर्पिओ गाडी कडे गेला. दरम्यान मिळालेल्या संधीचा फायदा घेत फिर्यादी व त्यांचा मजूर त्या ठिकाणावरून जंगलात पळून गेले. घटनास्थळी हजर होत पाहणी केली असता तिथे जमलेले लोक आपसात चर्चा करत होते की पप्पू गुप्ता ने या लोकाना मारले आहे. 

लागलीच फिर्यादी पोमकें बेडगाव येथे हजर झाले व पप्पू गुप्ता व त्याचे ८ साथीदार यांचे विषयी कायदेशीर फिर्याद दिली. त्यावरून कोरचि पोलिस ठाणे येथे ८४/२३ भा.द.वि ३९७, ३४१, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणात गुन्हे शाखा गडचिरोली तसेच कोरची पोलिस ठाणे येथील २ पथक आरोपीचे शोध कामी रवाना करण्यात आले होते. रात्री उशिराने आरोपी १) विजय ऊर्फ पपु प्रकाश गुप्ता (४४) रा. रांजणदगाव २) गणेशवर सिताराम सिन्हा (३५) यांना ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा नागपूर यांचा मदतीने गुन्हे शाखा गडचिरोली यांना यश आलेले आहे. 

आरोपी यांना कोरची पोलीसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ४ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.  इतर आरोपींचा शोध घेण्याकरीता वेगवेगळ्या टीम रवाना केल्या असून, इतर आरोपी लवकरच ताब्यात घेतले जाईल.

पुढील तपास पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. विठ्ठल सुर्यवंशी करत आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos