रात्री १२ वाजतापर्यंत भाजपाचे अशोक नेते ७७ हजार ३३६ मतांनी आघाडीवर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी /  गडचिरोली  :
  गडचिरोली -चिमुर लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार तथा विद्यमान खा. अशोेक नेते यांनी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कॉग्रेस-रॉकॉ आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांच्यापेक्षा तब्बल ७७ हजार ३३६ मतांची आघाडी घेतली होती. यामुळे    अशोक नेते यांचा दुसऱ्यांदा संसदेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  
खा. अशोक नेते यांना ५ लाख १७ हजार ७२२ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस-रॉका आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांना ४ लाख ४० हजार ३८६ मते मिळाली. तसेच वंचित आघाडीचे डॉ. रमेशकुमार गजबे यांना १ लाख १० हजार ७३६ , बहुजन समाज पार्टीचे हरिचंद्र मंगाम यांना २८ हजार ६ ,आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडियाचे देवराव नन्नावरे यांना १६ हजार ९० मते मिळाली. तर नोटावर २४ हजार ४१८ मते पडली.
 चिमूर- गडचिरोली या लोकसभा  निवडणूकीसाठी  १५ लाख ८० हजार ७० मतदारांपपैकी ११ लाख ३७ हजार २९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाची टक्केवारी ७२.०८ टक्के इतकी आहे.
गडचिरोली -चिमुर लोकसभा क्षेत्राची मतमोजणी आज २३ मे रोजी चंद्रपूर मार्गावरील शासकीय कृषी महाविद्यालयात सकाळी ८ वाजतापासुन प्रारंभ झाला
पहिल्या टप्यात म्हणजे ८ वाजता पोस्टल व इलेक्टिकल पोस्टल बॉयलेट मतपत्रिकेची मतमोजणी करण्यात आलीे. त्यानंतर ८.३० वाजता बायलेट पेपरची ( व्हिव्हिएम) मतमोजणीला सुरूवात करण्यात आली. कमीतकमी वेळेत मतमोजणीच्या फेऱ्या व्हाव्यात , यासाठी पोस्टल व बायलेट मतमोजणीसाठी स्वंतत्र कर्मचारी देण्यात आले होते. 
प्रशासनाच्यावतीने  उमेदवारांना फेरीनिहाय मिळालेले मतदान जाहीर करण्यात येत होते. भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार खा. अशोक  नेते यांनी प्रारंभापासुनच आघाडी घेतली होती. मध्यरात्रापर्यंत मतमोजणी सुरू होती.  यामुळे अंतीम निकाल प्राप्त् झाला नाही.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-23


Related Photos