चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून बाळू धानोरकर यांनी केला हंसराज अहिर यांचा ५५ हजार मतांनी पराभव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / राजुरा :
तब्बल चार वेळा चंद्रपूर-आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेलेले व केंद्रीय मंत्रिमंडळात गृह राज्यमंत्री असलेले हंसराज अहीर यांना  पराभवाचा सामना करावा लागला आहे .   बाळू धानोरकर यांनी  हंसराज अहिर यांचा ५५ हजार मतांनी पराभव केला आहे. 
 मतमोजणीच्या पहिल्या एक तासा नंतरच काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी मतांची आघाडी घेतली. चौथ्या फेरीत धानोरकरांनी २७३१ मताची आघाडी घेतली. त्या नंतर हळू हळू त्यांच्या मताची आघाडी वाढतच गेली. वणी-आर्णी क्षेत्रात अहीर यांना मतांची बढत मिळाली तर चंद्रपूर, राजुरा विधानसभा क्षेत्रात त्यांना कमी मते मिळाली, बल्लारपूर, मुल विधानसभा क्षेत्रात त्यांना काहीच फायदा झाला नसून याही क्षेत्रात त्यांना मतांची पिछाडी मिळाली. विशेष म्हणजे राजुरा विधानसभा क्षेत्रात आणि बल्लारपूर-मुल विधानसभा क्षेत्रात भाजपचेच आमदार असून सुद्धा या क्षेत्रात कमी मते मिळाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 
मतमोजणीच्या बाराव्या फेरीत काँग्रेसचे बाळू धानोरकर यांना ३६२८८९ मते, भाजपाचे हंसराज अहीर यांना ३३०२३६ मते आणि वंचित आघाडीचे राजेंद्र महाडोळे यांना ७३३४६ इतकी मते मिळाली. 
 काँग्रेसचे विजयी उमेदवार बाळू धानोरकर ३०८५९७, भाजपचे हंसराज अहीर २९४२३७, बहुजन वंचित आघाडीचे एड. राजेंद महाडोळे ६२१२९, बहुजन समाज पार्टीचे सुशिल वासनिक ६४७७, बहुजन मुक्ती पार्टीचे गौतम नगराळे १४३१, आंबेडकर पार्टी ऑफ इंडिया चे नितेश डोंगरे २५६२, बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टीचे पांडुरंग मडावी १९८१, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे माणिकराव शेडमाके १६७०, अपक्ष मधुकर निस्ताने ८९०, अपक्ष अरविंद राऊत ८१२, अपक्ष नामदेव किन्नाके ३२८२, अपक्ष मिलिंद दहिवले १३०७, अपक्ष राजेंद्र हजारे २३४८ आणि नोटा ६२४३ ला मते मिळाली. 
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून काँग्रेसने उत्तम उमेदवार दिल्यास भाजपाला कडवे आव्हान दिले जाऊ शकण्याचे भाकीत कार्यकर्त्यांनी आकले  होते. काँग्रेस श्रेष्ठींनी आगोदर विशाल मुत्तेमवार नंतर आशिष देशमुख यांची नावे उमेदवार म्हणून सुचविली होती. पण अचानक काँग्रेसचे निष्ठावंत विनायक बांगडे यांना उमेदवारी दिली पण त्यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध झाला शेवटी त्यांच्या ऐवजी शिवसेनेतून काँग्रेस मध्ये आलेले बाळू धानोरकर यांना उमेदवारी मिळाली हे मात्र येथे विशेष. 

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-05-23


Related Photos